तलाठी (गट – क) परिक्षेचा वेळापत्रक जाहिर
What is the date of talathi exam 2023
Talathi Bharti Exam Date 2023
महाराष्ट्र भुमी अभिलेख विभाग यांच्याकडुन तलाठी (गट-क)
या पदासाठी एकुण 4644 पदांसाठी उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते आणि जवळपास अकरा
लाख उमेदवारांचे अर्ज या पदांसाठी आले अशी माहिती भुमी अभिलेख विभागाकडुन देण्यात आली
होती. तलाठी (गट-क) या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षा घेण्यात येणार आहे
आणि मुख्य म्हणजे या परिक्षेला एकुण अकरा लाख उमेदवार बसणार आहेत. यासाठीचे वेळापत्रक
खालीलप्रमाणे महाराष्ट्र भुमी अभिलेख विभाग यांच्याकडुन सांगण्यात येत आहे.
तलाठी (गट-क) परिक्षा किती टप्यांत व किती
तारखेला घेण्यात येणार.
What is the pattern of Talathi exam
2023
1) पहिल्या टप्यातील परिक्षा = 17 ऑगस्ट
2023 पासुन ते 22 ऑगस्ट 2023 पर्यंत सलग राहिल.
2)
दुसर्या टप्यातील
परिक्षा = 26 ऑगस्ट
पासुन ते 01 सप्टेंबर पर्यंत राहिल.
3)
तिसर्या टप्यातील
परिक्षा = 04 सप्टेंबर
पासुन ते 14 सप्टेंबर पर्यंत राहिल.
(टीप :-
23,24,25 ऑगस्ट, 2,3,4,9,11,12 व 13 सप्टेंबर या दिवशी कोणतीही परिक्षा घेण्यात नाही
येणार याची काळजी घ्यावी. )
तलाठी (गट-क) 2023 परिक्षेचा वेळ काय राहिल
महाराष्ट्र भुमी अभिलेख विभाग यांच्याकडुन तीन सत्रांमध्ये परिक्षा
घेण्यात येणार आहे. ते खालील प्रमाणे.
1)
पहिले सत्र हे सकाळी
09:00 वाजेपासुन 11:00 वाजेपर्यत.
2)
दुसरे सत्र हे दुपारी
12:30 वाजेपासुन 02:30 वाजेपर्यत.
3)
तिसरे सत्र हे दुपारी
04:30 वाजेपासुन 06:30 वाजेपर्यत.
उमेदवाराला परिक्षा ज्या शहरात किंवा गावात
आहे हे आगोदरच ऑनलाईन पध्दतीने सांगितले जाईल व ज्या परिक्षा केंद्रावर परिक्षा आहे
हे मात्र उमेदवाराला परिक्षेच्या तीन दिवस आगोदर सांगिते जाईल. परिक्षा केंद्रावर कसलाही
अनुचित प्रकार न घडण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच परिक्षा ही
TCS कंपनी घेणार आहे असे राज्य परिक्षा समन्वयक रायते यांनी सांगितले आहे.
पेपर किती मार्काचा असेल व उत्तीर्ण होण्यासाठी
किती मार्क असणे आवश्यक आहे.
तलाठी (गट-क) या पदांसाठी घेण्यात येणारी परिक्षा ही एकुण
200 मार्कांची असेल आणि ही परिक्षा संगणकाच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे. व या
परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकुण 45% मार्क मिळवणे आवश्यक असेल.