तब्बल ३२ हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक जाहिर : महाराष्ट्रातील एकुण २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम; हे आहे भरतीचे ३ टप्पे

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 



  (Join What’s App Group)  

Join Telegram Group 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील
खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद शाळेतील  शिक्षक भरतीचा आता प्रारंभ झाला असून जानेवारीच्या
अखेर पर्यंत तब्बल ३२ हजार पदांची भरती होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील संस्था व जिल्हा
परिषदेच्या शाळांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तीन आठवड्यांची
म्हणजेच  ७ नोव्हेंबरपर्यंतची  मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवारांकडून
प्रत्येक प्राधान्यक्रम भरून घेण्यात येणार आहेत.

 

१६ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील
सर्व संस्थांसह ज्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम झालेली
आहे त्या सर्वांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठीचे आदेश
निघाले असून तीन आठवड्याच्या कालावधी पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. तसेच सध्या
राज्यातील २४ जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम  झालेली आहे तरी आणखी दहा जिल्हा परिषदांची बिंदुनामावली
मागासवर्गीय कक्षातर्फे पडताळली जात आहे.

 

‘कोणत्या’ जिल्ह्यांची बिंदुनामावली
पडताळणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर, जालना,  सातारा, अकोला, लातुर यवतमाळ, वाशिम, पुणे या जिल्ह्यांची
बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षामार्फत पडताळण्यात येत आहे. तसेच काही शिक्षकांच्या
मान्यता आणि नेमणूक कधीपासून व कोणत्या प्रवर्गातून झाली या बाबी तपासण्यात येत आहेत.
तसेच काही प्रकरणामधील अर्धवट कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येत आहे. आठ दिवसात
ही प्रक्रिया पूर्ण होईल.

 

भरती प्रक्रियाचे टप्पे खालीलप्रमाणे
असतील.

1)                 1)  ६ ऑक्टोबर पासुन ते ६ नोव्हेंबरपर्यंत ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती
अपलोड करणे.

2)                2)  १५ नोव्हेंबर नंतर तीन आठवड्यामध्ये उमेदवारांनी प्राधान्यक्रम
भरून देणे.

3)                3)  डिसेंबरच्या अखेर ते ३० जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध
केल्यानंतर पात्र उमेदवारांना नेमणुका.

 

खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन

महाराष्ट्रातील खासगी
अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरतावेळेस एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य
स्तरावरून मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठवले जाणार आहे. त्यानंतर त्या तीन उमेदवारांमधुल
एका उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. तसेच दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील
भरतीसाठी उमेदवारांना त्यांच्या मर्जीनुसार जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य
असणार आहे.

  (Join What’s App Group)  

Join Telegram Group 

कृपया ही
महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.



 





Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000