आता मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; Ayushman Bharat Yojana काय आहे अर्ज कसा करायचा संपुर्ण माहिती
भारत देशातील प्रत्येक नागरीकास उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना म्हणजेच Ayushman Bharat Yojana सुरू केली आणि ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे, ज्याद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय गरजु लोकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर या आयुष्मान कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तर ते घरबसल्या डाउनलोड करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात अर्ज करण्याची पद्धत.
1) सर्वात आगोदर PMJAY च्या अधिकृत वेबसाइट वर म्हणजेच https://pmjay.gov.in/ वर जाऊन होमपेजवर ‘Am I Eligible’ हा पर्याय निवडा. तुम्हाला हे फक्त वरच्याच मेनूमध्ये दिसेल. त्याच्या आधी एक प्रश्नचिन्ह आहे (?) त्यावर क्लिक करा.
2) त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल. यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तेथे दिलेला कॅप्चा कोड टाकून OTP मिळवा.
3) तुमच्या मोबाईलवर आलेला OTP पाहा व तो विहित फील्डमध्ये टाका. मोबाइलवर आलेला OTP टाकल्यानंतर, तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. तुम्ही जिथे राहता ते राज्य निवडा.
4) राज्य निवडल्याच्यानंतर, तुम्हाला तुमची श्रेणी निवडावी लागेल. आपण ज्या श्रेणीद्वारे आपले नाव तपासू इच्छितो ती श्रेणी निवडा व काही राज्ये फक्त रेशनकार्ड क्रमांकावरून तपासण्याची सुविधा देतात, तर काही राज्ये उमेदवाराचे नाव किंवा कुटुंब क्रमांकाद्वारे यादी तपासण्याची सुविधा देतात. काही राज्यांमध्ये मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि तुमच्या नावानुसार शोधण्याचे पर्याय आहेत. तुमच्या राज्यामध्ये दिलेल्या कोणत्याही पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
5) तुमचे नाव सर्च केल्यानंतर, तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात किंवा नाही. जर तुमचे नाव आयुष्मान भारत योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नसेल, तर सर्च रिझल्ट बॉक्समध्ये No Result Found असे लिहिलेले दिसेल.
आयुष्मान कार्ड मोबाइलमध्ये कसे डाउनलोड करायचे?
Ayushman Card Download
जर तुम्ही Ayushman Bharat Yojana साठी अर्ज केला आणि जर तुम्हाला तुमचे Ayushman Card Download हवे आहे. तर ते तुम्ही घरबसल्या डाउनलोड करू शकता, त्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://pmjay.gov.in/ वर जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला लॉगिन करून तेथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी व पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे ठसे पडताळुन ‘Approved Beneficiary’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला तेथे मंजूर झालेल्या गोल्डन कार्ड्सची यादी दिसेल. तेथे तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे आणि ‘Confirm Print’ या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला CSC Wallet दिसेल, येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तेथे तुमचा पिन टाका आणि होम पेजवर या आणि मग त्यानंतर तुम्हाला उमेदवाराच्या नावाने कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. तेथे किल्क करून तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
05 लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी योजना
आयुष्मान भारत योजना ही पीएम जन आरोग्य योजना या नावाने ओळखली जाते. या योजनेमध्ये 5 लाखांपार्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. औषधांचा आणि उपचाराचा खर्च सरकार देते. Ayushman Bharat Yojana साठी जे उमेदवार पात्र आहे अशा लोकांसाठीच आयुष्मान कार्ड बनवले आहे. यानंतर Ayushman Card धारकास सूचीबद्ध रुग्णालयांत मोफत उपचार मिळू शकतात.
5 thoughts on “Ayushman Bharat Yojana Apply Online : Ayushman Card Download”