” या सरकारी योजना महिला आणि मुलींसाठी आहेत फायद्याच्या “
Government Schemes for Girl Child in India
Government Schemes for Woman
* बेटी बचाओ, बेटी पढाओ *
( Beti Bachao Beti Padhao )
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ ला सुरू केली. मुलींचे प्रमाण खुप कमी असलेल्या महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांचा म्हणजेच छ. संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम, कोल्हापूर आणि सांगली या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेचा हेतु मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे व त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविणे, तसेच लिंग तपासणीवर प्रतिबंध आणण्यापासुन, मुलीचा जन्म व तिचे जगणे सुरक्षित करणे हा आहे.
* पब्लिक पोव्हिडेंट फंड *
( Public Provident Fund )
PPF पीपीएफ गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेमार्फत सरकारकडून गुंतवणुकदाराला 7.1 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. यात गुंतवणुकदार जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतो. यात बर्याच सवलती देखील मिळतात.
* मनोधैर्य योजना *
( Manodhairya Scheme)
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या स्त्रिया, बालके व त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदतीसह मानसोपचार तज्ज्ञांची सेवा देणे, अशा बळी पडलेल्या महिलांना आणि बालकांना शारीरिक आणि मानसिक अपघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न, आर्थिक सहाय्य, समुपदेशन, निवारा, वैद्यकीय मदतीसह कायदेशीर मदत देणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतीच महत्वपूर्ण अशी मनोधैर्य योजना सुरु करण्यात आली आहे.
* महिला सन्मान बचत योजना *
( Mahila Samman Bachat Patra Yojana )
केंद्र शासनाने केंद्रीय आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमार्फत गुंतवणुकदाराला 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळते. यात महिला गुंतवणुकदार 2 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतात. आणि त्यांचा कार्यकाळ हा २ वर्षांचा आहे.
* माझी कन्या भाग्यश्री *
( Mazi Kanya Bhagyashree )
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यात सुधारणा करणे, तसेच बालविवाह रोखणे, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यापासुन बालिका भ्रूणहत्या थांबविणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेमार्फत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे जन्मत: 21 हजार 200 रुपये जन्मानंतर एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतविले जातात तसेच मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये इतकी रक्कम मुलीला प्रदान करण्यात येते.
* सुकन्या समृद्धी योजना *
( Sukanya Samriddhi Yojana )
ही योजना मुख्यतह: मुलींसाठीच राबवण्यात आली आहे. यात 10 वर्षांपर्यंतची मुलगी असल्यास तिच्यानावाने खाते सुरु करता येऊ शकते तसेच तुम्ही यात 250 पासून ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक सुध्दा करु शकता. सध्याच्या घडीला या योजनेवर
सरकारतर्फे 8 टक्के व्याज देण्यात येते.
* नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट *
( National Saving Certificate)
स्त्रियांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये किमान रु. 1,000 ते त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. या ठेवीवर ७.७ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणूकदार तब्बल पाच वर्षांच्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करू शकतात.
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा