वेरूळ लेणीचा इतिहास तसेच वेरूळ
लेणीचे काही लपलेले वैशिष्टय
हजारो वर्षापुर्वी पृथ्वीवर
स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण होते. ज्यांची नाव निषाणी कुठेच आढळत नाही.
कि पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करण्यासाठी भगवंतानेच त्यांना पाठवले होते अशी वेरूळ
ही जगप्रसिध्द शिल्पकला निर्माण करणारे या अनामिक कलाकारांबद्दल बोलले जाते.
वेरूळच्या एकुण लेणी
समुहात एकुण 34 लेण्यांमध्ये 16 हिंदु लेण्या, 13 बौध्द लेण्या, आणि 5 जैन लेण्या आढळतात.
तीन धर्माचे अधिष्ठाण असलेल्या शिल्पकला एकाच ठिकाणी येथे पहावयास मिळतात. यातुन परमधर्म
सहिष्णुतेचे अनोखे दर्शण घडते. UNESCO या जागतिक संघटनेने जाहिर केलेल्या जागतिक वारसा
यादीमध्ये भारतातील ज्या मानवनिर्मित वास्तुकलेचा समावेश झाला आहे त्यातील छ. संभाजीनगर
जवळील लेणी समुह म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला एक प्रकारे स्वर्गच महणता येईल. छ. संभाजीनगर
पासुन सुमारे 28 किमी अंतरावर हा शिल्प खजिणा आहे. देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम
हे पहाडांच्या मध्य भागी झालेले आहेत. परंतु वेरूळचा लेणी समुह सलग एका खडकातुन तयार
करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम आगोदर कळस मग पाया या वचनानुसार
पहाडाच्या शिखरापासुन प्रारंभ करून पायथ्यापर्यंत हे अवलौकिक शिल्प साकारण्यात आलेले
आहे.
वेरूळ मधील कैलास मंदिराचे आकारमान
या लेण्यांमधील कैलास
मंदिर लेणी म्हणजे एक संद खडकातुन निर्माण
केलेले अजरामर अलौकिक शिल्पकला आहे. 29 मी. उंच आणि 50 मी लांब आणि 33 मी रूंद
असे कैलास लेण्यांचे आकारमान आहे. शिवाचे निवासस्थान म्हणुन या लेण्याला कैलास लेणी
असे म्हटले जाते. हजारो वर्षापुर्वी हतात फक्त छनी आणि हतोडा घेऊन अज्ञात कलाकरांनी
हे शिल्प निर्माण करून हिंदु संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवला असे म्हणण्यास हरकत
नाही.
वेरूळ लेणीचे मुख्य नाव काय आहे ?
ज्या पहाडात ही लेणी
निर्माण झाली तिला एल्लुर पर्वत असे म्हणतात. ज्याच्या जवळुन एलगंगा नावाची नदी वाहते,
एलु पर्वत आणि एलगंगा यावरून या ठिकाणाला एल्लुर हे नाव पडले परंतु कालांतराने अपभ्रंष
होऊन एल्लुर हे नाव रुढ झाले.
वेरूळचे कैलास मंदिर कसे निर्माण केले गेले ?
कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारेच्या
दोन्ही बाजुस सुबक शिल्प आहे त्यांना पौराणिक पार्श्वभुमी आहे त्यातील शंकनिधी आणि
पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष वेधुन घेतात. तसेच जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ
यांनी शिल्प कलांचे सौदर्य खुलवलेले आहे. एकाच प्रसारातुन निर्माण झालेले हे कैलास
लेणी इसवीसन आठव्या शतकाच्या उत्तरार्धात राजा कृष्णराज यांच्या औंदर्य प्रोत्साहाने
निर्माण झालेले आहे. कैलास लेणी ही प्रारंभी मानिकेश्वर नावानी प्रचलित होती. इतिहासकार
व जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर
सोईचा मोठा खडक निवडला आणि तो डोंगरापासुन अलग करून घेतला नंतर शिखरापासुन खोदकामाला
सुरूवात करण्यात आली. तसेच त्याकाळच्या प्रचलित पध्दतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम
नव्हेच तर शिल्पकलेने कोरिव कामातुन साकारलेले ते शिल्पच आहे.
येथे असलेल्या 16 हिंदु
लेण्यांवर पौराणिक प्रसंगावर भर देण्यात शिल्पकारांनी आपले कौशल्य पणास लावले आहे.
शतकापेक्षा जास्त काळ परिश्रम घेऊन एकसंग प्रसारातुन कल्पकतेने विशाल देखनी लेणी निर्मान
करणे हा खर तर वास्तु शास्त्रामधील अजब गजब प्रकारच होय प्रत्येक भागातिल लहान मोठया
शिल्पकृती पौराणिक कथेचे सादरिकरण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. दुर्गामुर्ती, गजलक्ष्मी,
जलभिषेक करणारे गजराज योच्या बरोबरीने पानांफुलांचा जो निसर्ग अविष्कार दाखवलाय तो
सर्व सजिव आणि अतिशय बोलका वाटतो.