शासनाच्या एका सर्वेक्षणामधुन असे समोर आले आहे की, भारतातील कंपन्या या वर्षी 12 टक्यांनी पगारवाढ देण्यास तयार आहेत. कारण कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगले करायचे आहे.
कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी 9 ते 12 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता
मिंट अँड शाइन या कंपनीने हे सर्वेक्षण केलेले आहे यानुसारच यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्के पगारवाढ मिळेल अशी खात्री आहे, सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे कि सर्वेक्षणा मध्ये समाविष्ट असलेल्या सुमारे 34 टक्के एचआर अधिकाऱ्यांनी या पगारवाढीच्या आकडेवारीला मान्यता मिळवून दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मतानुसार कर्मचाऱ्यांना सुमारे 20 ते 24 टक्के वेतनवाढ अपेक्षित असल्याच सर्वेक्षणामध्ये पहायला मिळत आहे. सर्वेक्षण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुमारे 20 टक्के ते 24 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यावेळेस पूर्ण होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठ कर्मचाऱ्यां बरोबरच कंपन्याही सकारात्मक : Good News For Employees
या अहवालामध्ये सुमारे 3000 HR अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची मते नोंदवून घेण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यामधे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणा मध्ये तब्बल 49 टक्के भरती करणाऱ्यांनी मूल्यांकनाच्या बाबतीत सकारात्मक मत दिले असुन सुमारे 25 टक्के कंपन्यांमध्ये 6 टक्के ते 8 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी बाबत सुध्दा कंपन्या सकारात्मक आहेत.
1 thought on “कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ! यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 12 टक्क्यांनी वाढ !”