महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्याकरिता Jalyukt Shivar Abhiyan मार्फत महाराष्ट्र शासन चार लाखा पर्यंतचे अनुदान देते. अनुदानासाठी मंजुर निधी असताना विहीर खोदण्याची प्रक्रिया मात्र पुरेशी होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने आता ग्रामपंचायतीने खोदाईचे किमान १५ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या असून ग्रामविकास विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्या नुसार, या वेळेस राज्यामध्ये दुष्काळ असल्या कारणाने शेतकऱ्यांचा कल विहीर खोदाईकडे राहील. म्हणुनच जलयुक्त शिवार ‘प्रत्येक शेताला पाणी’ ही संकल्पना राज्य सरकार कडुन हाती घेण्यात आली आहे.
विहीर खोदण्यासाठी किती टप्प्यांमध्ये अनुदान मिळते
- पहिल्या टप्यामध्ये विहीर खोदण्याच्या आगोदर अनुदान दिले जाते.
- दुसर्या टप्यामध्ये विहीरीचे खोदकाम 30 ते 60 टक्के झाल्यावर अनुदान दिले जाते.
- तिसर्या टप्यामध्ये विहीरीचे खोदकाम पुर्ण झाल्यावर अनुदान दिले जाते.
गैरव्यवहार टाळण्या करिता या तीन टप्प्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
विहिरीच्या अनुदानासाठी कसा करायचा ऑनलाइन अर्ज ?
विहीर खोदण्याच्या अनुदानासाठी अर्जदार शेतकऱ्यांना आगोदर फक्त ग्रामपंचायतकडे संपर्क करण्याचा पर्याय दिला होता. पण आता महाराष्ट्र राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘गुगल प्ले स्टोअर’ मध्ये ‘MAHA EGS Horticulture / Well App’ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विहिरीसाठी शेतकरी आपल्या मोबाईल वरूनच ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतो.
Jalyukt Shivar Abhiyan प्रत्येक शेताला पाणी ऑनलाईन अर्जासाठी ऍ़प डाउनलोड करा
ॲप्लिकेशनची लिंक
जलयुक्त शिवार प्रत्येक शेताला पाणी योजनेमार्फत असे मिळते विहीरीसाठी अनुदान !
- मोबाईल ॲप्लिकेशन मधून ऑनलाइन अर्ज करणे अथवा ग्रामसेवकाशी संपर्क साधून विहीर अनुदानासाठी ची मागणी नोंदवुन घ्यावी.
- अर्जदार शेतकऱ्याची मागणी ग्रामसेवक यांच्याकडुन तालुका पंचायत समिती मधील तांत्रिक सहायकास कळवली जाते.
- प्रत्येक ग्रामपंचायती मधील ग्राम रोजगार सेवक (मनरेगा) तसेच ग्रामसेवक यांच्या मार्फत विहीर खोदकामाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जातो.
- विहीर खोदकामाचा कार्यारंभ आदेश मिळवण्यासाठी अर्जदार शेतकरी आपला सातबारा, 8-अ आणि जॉबकार्ड थेट अपलोड करू शकतात अथवा ग्रामपंचायत मध्ये जमा करू शकतात.
- विहिरीच्या नियोजित जागेची ‘अ’ लघू पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता अथवा उपअभियंत्याकडून पाहणी केली जाते आणि तांत्रिक मान्यता दिली जाते.
- त्यानंतर स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या प्रस्तावाला प्रशासकीय अधिकृत मान्यता देतात. एवढी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विहीर खोदण्याचा कार्यारंभ आदेश काढला जातो.
टीप = लक्षात ठेवा..! कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वी विहीर खोदू नये. यामुळे अनुदान नामंजूर होण्याची शक्यता असते.
5 thoughts on “आता विहिरीला मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान ! जलयुक्त शिवार प्रत्येक शेताला पाणी अभियान पहा संपुर्ण माहिती !”