गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यांतील २४ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी आयोगातर्फे नुकतीच GPSC 24 Vacancy Recruitment जाहिरात काढण्यात आली आहे. या जागांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. २४ पैकी १९ जागांवर थेट, तर ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे (ट्रान्सफर बाय डेप्युटेशन) भरती करण्यात येणार आहे.
थेट पद्धतीने भरण्यात येणाऱ्या १९ जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२४ असेल, तर बदली प्रतिनियुक्तीच्या पाच जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२४ आहे. यानुसार गोवा वैद्यकीय महविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ५ जागांवर बदली प्रतिनियुक्तीद्वारे भरती केली जाईल. मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत (आयपीएचबी) दोन मानस शास्त्रज्ञांची थेट पद्धतीने भरती होणार आहे.
याशिवाय आरोग्य संचालनालयात दोन, आर्किटेक्चर महाविद्यालयात एक, अभियांत्रिकी महाविद्यालय दहा, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एक, महिला आणि बालकल्याण खात्यात दोन, उच्च शिक्षण खात्यात एका जागेवर थेट पद्धतीने भरती होणार आहे. अर्ज केलेल्या व्यक्तींची आयोगातर्फे मुलाखत घेतली जाणार आहे. अ गटातील जागांसाठी कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र पात्र उमेदवार न मिळाल्यास आयोगातर्फे ही अट शिथिल करण्याची शिफारस करण्यात येईल.
- Indian ARMY Dental Corp SSC Officer Bharti 2024
- लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील मुलींना आता मिळणार 1 लाख 1 हजार रूपये
- आता मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; Ayushman Bharat Yojana काय आहे
- पोस्ट ऑफिस PPF योजना गुंतवणुक किमान 500/- आणि मिळकत 40 लाखा पर्यंत
- महाराष्ट्र सरकार तर्फे आता वाळू व रेती मिळणार मोफत संपुर्ण माहिती येथे
गोवा लोकसेवा आयोगात २४ पदांची भरती लवकरच : GPSC 24 Vacancy Recruitment Update
🙏🏻 कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा 🙏🏻