संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनां मार्फत अशा वृध्द व्यक्तींना ज्या व्यक्तीस कुणाचा आधार नसेल किंवा जे वयोवृध्द व्यक्ती निराधार असतील अशा वयोवृध्द व्यक्तींना चांगले आयुष्य जगता यावे तसेच त्यांना दवाखाण्यासाठी किंवा इतर आवश्यक वस्तू घेता याव्यात यासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या तसेच संस्थांच्या माध्यमातुन महिन्यासाठी एक ठराविक मानधनाच्या स्वरूपात पैसे दिले जातात.
संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र 2023
हे मानधन याआगोरद तहसिलदाराकडे येत असुन तहसिलदार मानधन संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तातरीत करत असत. परंतु आता शासनाने है पैसे डायरेक्ट लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे अशी भुमिका घेत. आता है पैसे लाभार्थ्यांना DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशिअरी ट्रांसफर च्या माध्यमातुन देण्याचे ठरविले असुन याबाबत शासनामार्फत कार्यवाही सुरू झालेली आहे.
लाभार्थ्यांना काय करावे लागेल : संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र 2023
संबंधित लाभार्थ्यांना आता काय करावे लागेल असा प्रश्न पडला असुन जे वृध्द नागरिक या योजनांचा लाभ घेत होते किंवा आता घेणार आहे अशा लाभार्थ्यांना सर्वात आगोदर आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर बँकेत जाऊन त्यांच्या आधार कार्ड ला बँक खात्यासोबत लिंक करायचा आहे. हे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांकडून करण्यात येत आहे.
संजय गांधी निराधार योजना फॉर्म Online : संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र 2023
आत्तापर्यंत संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनांचे मानधन या संबंधित तहसिलदाराकडून योजने संबंधित बँकेमध्ये आपापल्या हद्दीतील लाभार्थ्यांची यादी पाठवली जयची आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यास ती रक्कम बँकेकडून हस्तांतरीत केली जात होती. आणि या प्रक्रियेस विलंब सुध्दा लागत होता तसेच पैसे न आल्यामुळे वृध्द बँकेमध्ये बर्याच चकरा माराव्या लागायच्या त्यामुळे या संपुर्ण प्रक्रियेमध्ये वृध्द लाभार्थ्याचे हाल होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याच सांगितल जात आहे. तसेच या सर्व गोष्टींचा विचार विनीमय करून शासनाने डायरेक्ट DBT मार्फत पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्याचे पाऊल उचलले. यामध्ये वृध्द नागरिकांची हेळसांड तर थांबेलच तसेच बँक कर्मचार्यांचे सुध्दा ओझे हलके होणार आहे.
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे : संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र 2023
संजय गांधी आणि श्रावणबाळ या दोनही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांकडून आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर जमा करण्याची प्रक्रिया गावपातळीवर सूरू झालेली आहे. तसेच गावपातळीवरील तलाठ्यांना सुध्दा याबाबत सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना तसेच लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे अपडेट करणे आणि मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक करूण घेणे यासारख्या सूचना तहसिलदारांकडून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी सहकार्य केले नाही किंवा त्यांची कागदपत्रे वेळेवर तलाठ्याकडे सुपूर्द केले नाही असे लाभार्थी या योजनांपासुन वंचित राहू शकतात असेही सांगण्यात आले आहे.
संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेसाठी या कागदपत्रांची आवश्यकता
संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनेनुसार दिले जाणारे मानधन आता थेट लाभार्थ्यांना DBT प्रक्रिये द्वारे बँक खात्याद मिळेल. यासाठी लागणारे कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, तसेच बँक अकाउंटला लिंक फोन नंबर या कागदपत्रांचा समावेश आहे.