SC Student Scholarship Update
SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता “नॉन क्रिमिलेअर” हे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार
SC Category Scholarship Update
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच SC Category Student ना देखील परदेशी शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण बंधणकारक असणार असून राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्ग (ओबीसी), मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कॉलरशिप आणि परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडून समान धोरण निश्चित करण्यात आलं आहे.
नव्या नियमांच्या आधारे अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या कक्षेमध्ये आणण्यात आलं आहे.
राज्यात अनुसूचित जाती तसेच नवबैद्धांसाठी बार्टी यासारखी संस्था तर ओबीसींसाठी Mahajyoti, Maratha, Kunbi Maratha व Maratha Kunbi समाजाकरिता Sarthi, आणि खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी Amrut अशा संस्था सध्या राज्यात कार्यरत आहेत. या सर्वच संस्था विद्यार्थ्यांसाठी Scholarship, परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती, MPSC, UPSC, Banking, रेल्वे तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण योजना राबवत आहेत. पण प्रत्येक संस्थेची विद्यार्थी संख्या आणि इतर निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे सर्वच संस्थासाठी एक समान धोरण ठरवण्याचा निर्णय 12 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता अनुसूचित जाती तसेच नवबैद्ध विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सर्वच प्रवर्गातील उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असलेल्या विद्यार्थी – विद्यार्थीणींना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.