महाराष्ट्रात राज्यामध्ये लवकरच मेगा
पोलीस भरती सुरू होणार
Maharashtra Police Bharti 2024 Vacancy
महाराष्ट्रात राज्यामध्ये लवकरच मेगा पोलीस भरती सुरू होणार असुन महा पोलीस भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये ९८ हजार पोलिसांची भरती होणार आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात पोलीस बनण्याची स्वप्न पाहत आहेत त्यांनी पोलीस भरती परीक्षा 2023 ची तयारी आतापासूनच करायला हवी.
पोलीस आणि लोकसंख्या यांचे प्रमाण सुधरवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लवकरच ९८ हजार पोलीसांची भरती करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एक लाख लोकसंख्येमागे १३६.४५ इतकेच पोलीस असून पोलिसांची हीच संख्या २२५ इतकी करण्याची तयारी आहे. महाराष्ट्र राज्यामधील पोलीसांची एकूण संख्या सध्या २.४५ लाख एवढी आहे. पोलिस भरती संदर्भातील निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
गृह खात्याचे अधिकारी काय म्हणाले ?
अर्थ खात्याची उपसमिती आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खालील उच्च अधिकार समिती यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील पोलीस कर्मचाऱ्यांची आत्ताची संख्या कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु प्रत्येक पोलीस स्टेशनमधील तसेच संबंधित युनिटमधील कर्मचाऱ्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, असे गृह खात्याचे अधिकारी म्हणाले. हे काम पुर्ण झाल्यानंतर आता आम्ही अतिरिक्त ९८ हजार पोलिसांची भरती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी कमीत-कमी ५० टक्के पदांना का होईना मंजुरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, असे गृह खात्याचे अधिकारी म्हणाले.
केंद्र सरकारने मार्च 2023 मध्ये संसदेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरात देशाचे सध्याचे लोकसंख्या पोलीस यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १५२.८० एवढे आहे. नागालँडमध्ये हेच प्रमाण सर्वात जास्त ११८९.३३ पोलिस तर बिहार राज्यामध्ये सर्वात कमी ७५.१६ इतकेच पोलिस आहे.