Lek Ladki Yojna Maharashtra लेक लाडकी योजना आता सूरू होणार असुन मुलिंना एक लाख एक हजार रूपये या योजनेद्वारे मिळणार आहे. तसेच ही रक्कम कशी मिळणार, कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असणार या सर्व गोष्टी आपण आज जाणुन घेणार आहोत. तर माहिती पुर्ण वाचा.
Lek Ladki Yojna मध्ये पैसे किती टप्यांत मिळणार
राज्यात मुलिंच्या सक्षमिकरणासाठी लेक लाडकी ही योजना राबवली जाणार आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलिंना Lek Ladki Yojna 2024 चा लाभ घेता येणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये तसेच मुलगी इयत्ता पहिली वर्गात गेल्यानंतर 6,000 रूपये तसेच सहावी वर्गात गेल्यानंतर 7,000 रूपये तसेच अकरावीमध्ये गेल्यानंतर 8,000 रूपये आणि 18 वर्षे पुर्ण झाल्यावर 75,000 रूपये असे एकुण एक लाख एक हजार रूपये लाभार्थी मुलींना मिळणार आहेत.
Lek Ladki योजनेचा उद्देष्य काय
लेक लाडकी या योजनेचा मुख्य उद्देष्य मुलींच्या जन्मासाठी प्रोत्साहन देणे तसेच मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणामध्ये आर्थिक अडथळा येऊ नये, मुलिंचा मृत्युदर कमी करणे, बालविवाहास आळा घालणे, मुलिंचे कुपोषणा पासुन बचाव करणे तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहण मिळणे इत्यादी आहे.
लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती
कुटुंबात जन्मणा या 1 किंवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुस या प्रसुतीच्या वेळी जर जुळी आपत्ये जन्माला आली तर एक मुलगा किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 1 एप्रिल 2023 च्या आगोदर 1 मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुळ्या मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न एक लाख किंवा एक लाखापेक्षा कमी असावे.
Lek Ladki Yojna मध्ये पैसे कसे मिळणार
लेक लाडकी या योजनेमध्ये थेट DBT द्वारे लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यात येणार आहे. म्हणजेच लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला जे बँक अकाऊंट लिंक असेल त्या अकाऊंटमध्ये पैसे मिळणार आहेत.
5 thoughts on “What is Lek Ladki Yojna Maharashtra 2024 : लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील मुलींना आता मिळणार 1 लाख 1 हजार रूपये”