मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासुन सूरूवात लगेच अर्ज करा.

       नमस्कार मित्रांनो काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे मंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली असुन या योजनेला आजपासुन अर्ज करण्यास सुरूवात होत आहे. तर चला पाहुया या योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे. त्यासोबतच अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. आणि या योजनेला अर्ज कुठे व कसा करायचा ही सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उद्दीष्ट : Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना आवश्यक त्या सोयी आणि सुविधा मिळणे, महिलांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करणे, महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भ बनविणे, महाराष्ट्रातील महिला तसेच मुलिंच्या सशक्तीकरणास चालणा मिळणे, महाराष्ट्रातील महिलांच्या आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबनेत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Eligibility

  • ज्या महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्षांच्या मध्ये आहे अशा विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधान, घटस्फोटित महिला पात्र असतील.
  • महिला महाराष्टाची रहिवासी असणे आवश्यक.
  • नॅशनलाईस बँकेत खाते असणे आवश्यक.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्प्न्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असणे आवश्यक.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड.
  • रहिवाशी प्रमाणपत्र किवा जन्म दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला. (अडीच लाखांपेक्षा कमी)
  • पासबुक.
  • रेशन कार्ड.
  • हमीपत्र.
  • पासपोर्ट फोटो.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी अर्ज कुठे करायचा. : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Online Form

ज्या महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाला अर्ज करायचा आहे अशा महिलांनी आपल्या जवळील सेतु सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज सूरू होण्याची दिनांक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाला अर्ज 01 जुलै 2024 या तारखेपासुन सूरू होणार आहेत. तर ज्या महिलांना अर्ज करायचा आहे अशा महिलांनी 01 जुलै 2024 रोजी आपल्या जवळील सेतु सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची दिनांक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाला अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करायचा आहे. अशा महिलांनी 01 July ते 31 August या तारखे दरम्यान अर्ज करायचा आहे.

Leave a Comment

Staff Nurse Job In Berlin Germany General Manager Sales And Marketing Job In Pagariya Auto LIC Insurance Agent Vacancy In Aurangabad Purchasing Manager Job In Singapore : Monthly Salary Upto 400,000 Insurance Agent Vacancy in TATA AIA Life : Monthly Salary Upto 1,02,000