दोन धर्मामध्ये किंवा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल त्याबरोबरच महापुरुषांबद्दल बदनामी यासारखी पोस्ट व्हायरल करणाऱ्यां युसर्स विरुद्ध भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम 66 (C) तसेच भारतीय दंड विधान कायद्या अंतर्गत कलम 505 (2) यासह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल यामध्ये आरोपीस 3 वर्ष ते 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद संविधानामध्ये आहे. अशी माहिती खुद्द इलेक्शन कमिशन आणि सायबर क्राईम ब्रांच मार्फत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक तसेच येणार्या काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सोशल मिडियावर कडक लक्ष आहे. काही युसर्स जाणीवपूर्वक विणाकारण सामाजिक शांतता धोक्यात येईल यासाठी प्रयत्न करत असतात, अशा लोकांवर विशेष लक्ष ठेवुन आहे. प्रत्येक युसर्सने पोस्ट व्हायरल व शेअर करण्यापूर्वी खात्री करावी, Whats App Group वर चुकीची पोस्ट टाकणारा आणि त्या पोस्टला प्रतिसाद (Reply) देणाऱ्याविरुद्ध सुध्दा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक शांतता बिघडणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चुकीचा मेसेज, पोस्ट व्हायरल करण्यापुर्वी खात्री करा कारण Crime Branch Alert on Election Baground
सायबर सेल तर आहेच परंतु आता पोलिसांनी स्वतंत्रपणे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल सुध्दा सुरू केला आहे. स्वत: पोलिस आयुक्त दररोज त्याचा आढावा घेता. सोशल मीडिया चा वापर करणाऱ्या प्रत्येकाने कोणतीही पोस्ट व्हायरल करताना त्याबद्दल खात्री करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो.
Whats App Group Admin सुध्दा जबाबदार असणार
सामाजात तेढ निर्माण होईल अथवा इतर कोणी व्यक्ती गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली आणि त्या पोस्टला व्हाट्सॲप ग्रुपमधील इतर मेंबर्सनी प्रतिसाद दिल्यास संबंधित व्हॉट्सऍ़प गुपच्या ॲडमिनविरुद्ध पण भा दं वि कलम 34 नुसार गुन्हा दाखल होतो. आपल्या व्हाट्सॲप ग्रूपमध्ये आक्षेपार्ह, भडकाऊ पोस्ट टाकणाऱ्यांची माहिती संबंधित पोलिसांना देणे किंवा सेल्फ ॲडमिनचा पर्याय निवडणे, ग्रुपमधील आक्षेपार्ह पोस्ट दिसताच डिलीट कराव्यात, असेही पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे.